Showing posts with label #raj #mns #मनसे. Show all posts
Showing posts with label #raj #mns #मनसे. Show all posts

Saturday, 13 April 2019

मार्शल टिटो


मागे म्हणजे जवळ जवळ 3-4 वर्षा पूर्वी, मी उद्धव ठाकरेंचा मार्शल टिटो होईल का? असा लेख टाकला होता. तुमच्या वैचारिक मित्रांशी शत्रुत्व पत्करण्याचे काय परिणाम मार्शल टिटो ला भोगावे लागले हे त्यात मी सांगितलं होतं. आणि उद्धव जी सुद्धा त्याच वाटेने जात असल्याच दाखवलं होतं.
मार्शल टिटो हा युगोस्लाव्हिआ या देशाचा communist हुकूमशहा होता.  दुसऱ्या महायुद्धानंतर रशियाच्या स्टालिनशी त्याच भांडण झालं. स्टालिनने युगोस्लाव्हिआ च्या सीमेवर रणगाडे पाठवले. स्टालिनची अपेक्षा होती की टिटो येऊन माफी मागावी.
पण टिटो सरळ वॉशिंग्टन ला गेला आणि अमेरिकेची मदत मागितली. एक communist देश फोडायला मिळतोय म्हंटल्यावर अमेरिकेनेही 4 दशके, जवळ जवळ 40 वर्ष युगोस्लाव्हिआ ला मदत केली.
1990 मध्ये सोव्हित युनियन पडल्यावर अमेरिकेला युगोस्लाव्हिआ ची गरज उरली नाही. आज नकाशात बघाल तर युगोस्लाव्हिआ देश दिसणार नाही. त्याचे तुकडे झालेत. कारण अमेरिकेला युगोस्लाव्हिआशी काही कर्तव्य नव्हतं. त्यांना फक्त सोव्हिएत रशिया विरुद्ध त्याला वापराचा होता. आणि गरज संपल्यावर त्यांनी तात्काळ मदत थांबवली. रशियाशी पंगा घेतल्यामुळे त्यांनीही मदत केली नाही.
अमित शाह आणि भाजप वर बेछूट टीका करताना उद्धव ठाकरे ही त्याच मार्गाने जात आहेत असं मला सारख वाटायचं. उद्या वेळ बदलली की सेनेला एकंदर मामला जड जाईल असं वाटलं होतं. पण उध्दवजींनी वेळच माघार घेऊन भाजप बरोबर दिल जमाई केली. युती करून जागा वाटप ही उरकून घेतलं.
मला वाटलेलं आता संपूर्ण निवडणूक भर "खिशातले राजीनामे" हा विनोद प्रत्येक शिवसैनिकाला ऐकावा लागणार. काँग्रेस आणि राष्ट्रवादी सेनेच्या मतदाराला डीवचून डीवचून नामोहरम करून सोडणार.
पण तेवढ्यात अस्सल मार्शल टिटो प्रकट झाला.
राज ठाकरे यांनी आघाडीच्या गाडीत चढायचा प्रयत्न केला. तो असफल झाला म्हंटल्यावर त्याच्या मागे फरफटत जाण्यापर्यंत लाचारी स्वीकारली. शहिदांच्या विधवांची घरे ढापणार्या अशोक चव्हाणांसाठी सभा घ्यायची नामुष्की स्वीकारली.
आज जेंव्हा एखाद्या शिवसैनिकाला विचारतो राजीनाम्याचं काय झालं, तर तो म्हणतो "अमित शाह मातोश्रीवर वर आले म्हणून भाजप पेक्षा एक ही जागा कमी न घेता युती केली. उगाच मनसे सारखे बेगानी शादी में अब्दुला दिवाना नाही झालो"
जर कोणी स्वतःचा मार्शल टिटो करून घेण्यास उत्सुक असेल तर त्याला कोण रोखू शकतो. राज ठाकरेंच्या उदाहरणासमोर, शिवसेनेने पुन्हा युती करणं एक समजूतदार पर्याय वाटतो. सेना युती मध्ये तरी आहे, राज यांची मनसे औषधादाखल ही कुठे आघाडीच्या जवळपास सुद्धा नाहीये.
जो पर्यंत मोदी सत्तेत आहेत तोपर्यंतच तुम्हाला दोनशे आहेत. एकदा मोदींची सत्ता गेली की दोन वडापाव चे ही वांदे होतील.